Friday 9 December 2011

रेकॉर्डस् मेंट टू बी ब्रोकन ... !



          विक्रम हे होतात तेच मुळी मोडले जाण्‍यासाठी असं सांगितलं जातं. आणि तेच खरं आहे. आज केलेला विक्रम गुरु से सवाई चेला उद्या मोडत असतो. आणि हे सतत घडत राहणार आहे. यात खंड पडणार नाही. फरक फक्‍त इतका की तो विक्रम किती काळानंतर मोडला. एक दिवसीय क्रिकेट सुरु झाल्‍यानंतर 40 वर्षे लागली पहिलं व्दिशतक पूर्ण करण्‍याच्‍या विक्रमाला.
     पहिला एकदिवसीय क्रिकेट सामना खेळला गेला त्‍यावेळेपासून 40 वर्षात या प्रकारात 200 धावांचा पल्‍ला  कुणी गाठू शकलं नाही. हा विक्रम सचिन रमेश तेंडूलकर यांनी 24 फेब्रुवारी 2010 रोजी ग्‍वाल्‍हेरमध्‍ये मोडला. त्‍याचा विश्‍वविक्रम पुढील 40 महिन्‍यात मोडण्‍याची कामगिरी माँ दा लाडला विरुने इंदूरमध्‍ये 8 डिसेंबर 2011 रोजी केली आणि वीरुने 219 धावा काढल्या. तो बाद झाला त्‍यावेळी 3 षटके बाकी होती हे खास.
     काही खेळाडू जिगरबाज असतात तर काही चिवट 70 च्‍या दशकात चिवट खेळाडूंचा भरणा होता. पहिली विश्‍वचषक स्‍पर्धा 1975 साली इंग्‍लंडमध्‍ये झाली. त्‍यावेळी होणारे एक दिवसीय सामने चक्‍क  60-60 षटकांचे होते. त्‍यात आला सुनिल मनोहर गावसकर हा विक्रमादित्‍य होता. त्‍याच्‍या नावे एक आगळा विक्रम आहे. पहिल्‍या चेंडूपासून शेवटच्‍या चेंडूपर्यंत म्‍हणजे तब्‍बल 60 षटके फलंदाजी करण्‍याचा आणि त्‍यात गावसकरने किती धावा काढल्‍या असं विचारलं तर सांगताना नक्‍कीच हसू येईल. 60 षटके नाबाद राहण्‍याचा विक्रम करणा-या सुनिल गावसकरने फक्‍त 36 धावा काढल्‍या होत्‍या. आता बोला सचिन आणि विरेंद्र सेहवाग यांना 60 षटकांची खेळी करण्‍याची संधी मिळाली तर काय-काय विक्रम होतील याची कल्‍पना देखील अंगावर शहारे आणते. हे झंझावाती फलंदाज जर मुड मध्‍ये आले तर काहीही करु शकतात.
     कसोटी आणि एक दिवसीय सामन्‍यात एकत्रितपणे 100 वं शतक सचिन कधी लढवतो याची वाट सर्व क्रिकेट प्रेमींना आता आहे. ऑस्‍ट्रेलियन भूमीत हा विक्रम व्‍हावा ही कदाचित नियतीची इच्‍छा, कारण सर डॉन ब्रॅडमनची भूमी. सर डॉन ब्रॅडमनची महान कारकीर्द डोळ्यापुढे ठेवून सर्व खेळाडू आपली वाटचाल करीत असतात आणि त्‍यांच्‍या भूमीत हा विक्रम नोंदला जाणं उत्‍तमच.
     विरुचं अभिनंदन करताना महाशतकासाठी सचिनला बेस्‍ट लक.
-  पॅसिफिक
Watch viru in sction.. 

No comments:

Post a Comment