Saturday 17 December 2011

भारत रत्‍न ...!


          आणि सचिन तेंडूलकरला भारत रत्‍न देण्‍याचा मार्ग अखेर मोकळा झाला अशा आशयाच्‍या बातम्‍या आज सर्व वृत्‍तपत्रात आहे. कधी काळी याचप्रमारे सुनिल गावसकरला सर किताब मिळावा ही अपेक्षा भारतीय क्रिकेट रसिकांनी व्‍यक्‍त केली होती. मुळात त्‍याला त्‍याची आवश्‍यकता नाही असा खेळ सुनिल गावसकर करायचा. सचिनच्‍या बाबतीत भारतरत्‍नाची अपेक्षा पूर्ण करण्‍यासाठीचा निर्णय खरोखर चांगला निर्णय याबद्दल क्रीडा मंत्री अजय माकन यांचे अभिनंदनच करायला हवं.
Video youtube
     सचिनला क्रिकेटचा देव म्‍हटलं जातं आणि त्‍याची वागणूकही तशीच राहिलेली आहे. क्रिकेटच्‍या सर्व प्रकारात त्‍याचं वर्चस्‍व आहे. नुसती फलंदाजीच नव्‍हे तर त्‍याची गोलंदाजी देखील चांगली आहे आणि अगदी कठीण प्रसंगात त्‍यानं भारतात सामना जिंकून दिलेला आहे. कलकत्‍ता येथे झालेल्‍या हिरोकपचा फायनल आणि त्‍याचं शेवटचं षटक हे सचिनची महारथ अधोरेखित करणारं होतं.
     हल्‍ली क्रिकेटमध्‍ये चुरस प्रचंड वाढली आहे. सोबतच सामन्‍यांमधील निरसपणाही निघून गेला आहे. कसोटी सामने निकाली निघतात अगदी शेवटच्‍या चेंडूपर्यंत रंगलेली भारत-विंडीज यांच्‍यातील तिसरी कसोटी हे त्‍याचं उत्‍तम उदाहरण आहे. अशा काळात सचिनचं महत्‍व सर्वांनाच कळतं.
     सचिनची महानता मैदानातच नव्‍हे तर मैदानाबाहेरही दिसते. ख-या क्रीडा रसिकाप्रमाणे त्‍याचं टेनिस सामन्‍यांना हजेरी लावणं व इतर खेळांमध्‍ये रुची घेणं खरी खिलाडीवृत्‍ती आहे. अशा लाडक्‍या सचिनला भारतरत्‍न मिळालयला हवाच परंतु त्‍याआधी तो हॉकीचे जादुगार ध्‍यानचंद यांना मिळावा.
                                       - पॅसिफिक

No comments:

Post a Comment