Thursday 22 December 2011

सौरवचं चॅपेल प्रेम ...!



     बॉक्‍सींग डे टेस्‍ट मॅचचे कुतूहल सर्वांनाच आहे. हे कुतूहल मैदानावर होणार असलेल्‍या खेळाचे तर आहेत त्यासोबतच मैदानाबाहेर रंगत असलेल्‍या  सौरव गांगुली आणि ग्रेग चॅपेल यांच्‍यातील शाब्‍दीक कसोटीचेही आहे. भारतीय संघाला नवी ओळख देणारा कर्णधार सौरव आणि त्‍याला संघाच्‍या बाहेरचा रस्‍ता दाखवणारा ग्रेग चॅपेल यांच्‍यातला वाद तसा सवयीचा पण ऑस्‍ट्रेलिया दौ-यामुळे तो नव्‍याने समोर आलाय.
from youtube
     तसंही ग्रेग चॅपेलचं नाव कुणी फार अभिमानानं घेत नाही त्‍यानं त्‍याच्‍या कर्णधारपदाच्‍या काळात ऑस्‍ट्रलियाला एक आगळा पायंडा जरुर घालून दिला होता मात्र तो प्रत्‍येक संघात लागू होईल असं नसतं आणि हाच प्रकार त्‍याने भारतीय क्रिकेट संघाचा प्रशिक्षक म्‍हणून नियुक्‍त झाल्‍यावर केला त्‍यावेळी विरोध झाला हे देखील खरं.
     थोडासा पुढे येवून विचार केला तर कसोटीसाठी एक संघ  आणि एक दिवसीय सामन्‍सासाठी एक संघ  हा फॉर्म्‍यूला  ऑस्‍ट्रेलियन संघ  अनेक वर्षापासून राबवित आहे. हाच फार्म्‍यूला भारतीय संघात असावा असा प्रयत्‍न चॅपेल ने केला होता. आता चॅपेलही नाही आणि सौरवदेखील पण हा फॉम्‍यूला संघाने स्‍वीकारलाय हे खरच आहे.
     त्‍याची कृती चांगली होती की नाही यापेक्षा सौरवची दादागिरी मिडियाने उचलली त्‍यामुळे भलं कुणाचच झालं नाही. चॅपेलचं पद गेलं आणि सौरवची संघातली जागाही गेली. आता स्‍पर्धा इतकी प्रचंड आहे की सौरव पुन्‍हा संघात येण्‍याचा विचारही करु शकत नाही त्‍यामुळे आता फक्‍त तोंडी फटकेबाजी सुरु राहणार आणि त्‍यातही ऑस्‍ट्रेलिया दौ-यात समालोचनाचं काम सौरवला मिळालय. त्‍यामुळे सकाळी मैदानावरील फटकेबाजी होवो न होवो सौरवची फटकेबाजी ऐकायला मिळणं निश्चित आहे.
                    
-         पॅसिफिक

No comments:

Post a Comment