Tuesday 27 December 2011

नागपूर एक्‍स्‍प्रेसचा दिवस


          बहुचर्चित अशा मेलबॉर्न मैदानापासून भारताला कमी यश मिळालय अशा बॉक्‍सींग डे कसोटीची सुरुवात झाली. गो-या साहेबाचा हा खेळ म्‍हणजे पाऊस हमखास पाडणारा अगदी दुष्‍काळानं पोळलेल्‍या लगानमध्‍ये देखील पडलाच तसा तो आज पहिल्‍या दिवशी 45 मिनिटांचा वेळ खाऊन गेला. इथं आदल्‍या रात्री तर गारपीट झाली होती पण पाण्‍याचा निचरा करण्‍याची यंत्रणा उत्‍तम  असल्‍यानं खेळ झाला.
     पहिला दिवस भारतीय संघात असलेल्‍या नागपूर एक्‍सप्रेस अर्थात उमेश यादवच्‍या नावे द्यावा लागेल. आपल्‍या धडधडत्‍या एक्‍स्‍प्रेसने आरंभीच ऑस्‍ट्रेलियाची अवस्‍था 2 बाद 46 केली होती. पॉन्‍टींग आणि पदार्पण करणारा सलामीवीर एड कोवन यांनी तग धरीत केली शतकी भागीदारी ऑस्‍ट्रेलियाला सावरु शकली.
     अखेरच्‍या सत्रात पीटर सिडस आणि ब्रॅड हॅडिन यांनी केलेली 65 धावांची भागीदारीही मोलाची ठरली तरीही त्‍यांना 6 बाद 277 पर्यंत आटोक्‍यात ठेवता आलं. दोन कसोटीत 9 बळी घेणा-या उमेश यादवनं आरंभी भेदक मारा केला आणि आपण विकेट टेकर आहोत हे पुन्‍हा सिध्‍द केलं. 6 पैकी 3 विकेट त्‍यानं काढल्‍या.
     केवळ वेगवान गोलंदाजी महत्‍वाची नाही तर तो गोलंदाज विकेट टेकर हवा. असा विकेट टेकर मनोज प्रभाकर होता. आज धोनीनं भारतीय गोलंदाजीच्‍या मर्यादा पुन्‍हा ओळखल्‍या असणार हे स्‍पष्‍टच आहे. वेगवान आणि उसळी घेणा-या खेळपट्टीवर आणखी एक मध्‍यमगती गोलंदाज संघात असायला हवा होता. आपल्‍याला तिथल्‍या खेळपट्टयांचा विचार करुन संघ  निवड करायला हवी त्‍याचप्रमाणे पहिलाच दिवस असल्‍याने पॉन्‍टीग-कोवन यांची भागीदारी फोडण्‍यासाठी धोनीने एखादा धिम्‍यागतीचा गोलंदाज वापरायला हवा होता. यापूर्वीच्‍या  इथल्‍या कसोटी विरेन्‍द्र सेहवागने अशी गोलंदाजी करीत यश मिळवले होते.
     ऑस्‍ट्रेलियन फलंदाज नव्‍या दमाचे आहे. अगदी कमी अनुभव असणारे खेळाडू या संघात आहे त्‍यांना उसळत्‍या चेंडूचा मारा करुनच बाद करता येईल हे पाच वेळा झालंय. पॉन्‍टींग असो की कोवन हे सारे उसळत्‍या चेंडूवरच बाद झाले.
     नागपूर एक्‍स्‍प्रेस विकेट टेकर नक्‍की आहे परंतु लाईन योग्‍य न राखता आल्‍याने धावा देखील जास्‍त देते. कसोटीत हे चालून जाते मात्र मर्यादीत षटकांच्‍या सामन्‍यात नाही. त्‍यादृष्‍टीने उमेशला मेहनत करावी लागणार आहे.
Melbourne Cricket Ground MCG
     नाताळच्‍या सुटीत असलेला हा सामना आज इथं पहिलया दिवशी 70 हजारांहून अधिक क्रिकेट रसिक आले होते. अर्थात या उपस्थितीला सचिनचं महाशतकही कारणीभूत आहे. आपण ही संधी सचिनचं चित्र गेल्‍या  काही वर्षात दिसत आहे त्‍या पार्श्‍वभूमीवरही ही गदी महत्‍वाची. निरसपणा निघून गेल्‍याने कसोटी क्रिकेट पुन्‍हा गर्दी खेचतय हे नक्‍की.
उद्या उपहारापूवी्र उर्वरित चार गडी बाद करणं ही संधाची योजना असणार हे स्‍पष्‍टच आहे. खेळपट्टी फिरकीला सध्‍या साथ देत नाही आणि टिकून खेळलं तर धावा काढता येतील हे पॉन्‍टींग, कोवन आणि मायकल क्‍लार्क यांनी दाखवून दिलय. त्‍याचमुळे कसोटीत माहीची भिस्‍त विरु, सचिन लक्ष्‍मण आणि द्रविड यांचया खेळावरच राहील असं दिसतं.
-         पॅसिफिक

Read This Blog in Daily Lokshahi Warta Dated 27 December 2011

No comments:

Post a Comment